Sunday, March 3, 2024

जुनी पेन्शन बाबत

1/3/2024
जूनी पेन्शन बाबत
जूनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनै..2010 पासून 38आंदोलनै केली... नागपूर चा12 डिसेंबर  2023 चा मोर्चा अभूतपूर्व होता त्यात शिक्षक‌ परिषदेचा प्रचंड संख्येने सहभाग होता.....आज पेन्शन बाबत सकारात्मक विषय सरकार करते आहे.शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षकांना जो पर्यंत पेन्शन मिळत नाही तोपर्यंत मी पेन्शन घेणार नाही म्हणून  स्वताची पेन्शन नाकारली...... मुंबई शिक्षक परिषदेने मार्च 2023 ला मुंबईत 6 दिवस संपात भाग घेऊन निदर्शने केली..... त्यामुळे पेन्शन साठी अभयास गट नेमला होता.त्यांनी नोव्हेंबर  ला  सरकला रिपोर्ट सादर केला...पण 12 डिसेंबर 2023 ला अभूतपूर्व मोर्चा मुळे या रिपोर्टवर कारवाई सुरू झाली...आज काही प्रमाणात शिक्षक परिषदेला यश मिळाले असे म्हणू शकतो.शासन अधिक सकारात्मक झाले आहे.पण आज  सरकारने पेन्शन जी‌ घोषणा केली त्या बाबत प्रत्यक्ष जी आर आला की अभ्यासपूर्ण विवेचन व नक्की काय आहे ?हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद खुलासा करेल..थोडी वाट पाहू.....
पण लढाईत आपण एक पाऊल अजून पुढे टाकले आहे..
जय शिक्षक परिषद

आपला नम्र
शिवनाथ दराडे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई कार्यवाह

जुनी पेन्शन बाबत

1/3/2024 जूनी पेन्शन बाबत जूनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनै..2010 पासून 38आंदोलनै केली... नागपूर चा12 डिसें...