(Following is the official information from education department)
प्रिय विद्यार्थी , पालक ...
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनी दिनांक १४ नोव्हेंबर रोजी बालदिवस साजरा केला जातो.
या बालकदिवसानिमित्त बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दिनांक ०८ ते १४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत शासनाच्या वतीने ऑनलाईनपध्दतीने बालदिवस सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी पुढील ७ गटात उपक्रम घेण्यात येणार आहेत.
नियोजित सप्ताह कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे .
दिवस क्र ०१
दिनांक :- ०८-११-२०२०
इयत्ता :-१ ली व २ री-
उपक्रमाचे नाव :- भाषण
उपक्रम तपशिल :" मी नेहरु बोलतोय " या विषयावर ३ मिनिटांचा वैयक्तिक व्हिडिओ Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करावा .
👇👇👇
दिवस क्र ०२
दिनांक :- ०९-११-२०२०
इयत्ता :- ३ री ते ५ वी
उपक्रमाचे नाव :- पत्रलेखन
उपक्रम तपशिल : चाचा नेहरुंना पत्र लिहा . ( शब्द मर्यादा ३०० ) सदरील पत्र A४ साईज कागदावर लिहून सदर निबंधाचे स्पष्ट फोटो , PDF Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करावा.
☝️☝️☝️
दिवस क्र ०३
दिनांक :- १० -११-२०२०
इयत्ता :-६ वी ते ८ वी
उपक्रमाचे नाव :- स्वलिखित कविता वाचन
उपक्रम तपशिल :नेहरुंवर स्वत: लिहिलेल्या कवितेचे वाचन करून कवितेचा व्हिडीओ Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करावा.
दिवस क्र ०४
दिनांक :- ११ -११-२०२०
इयत्ता :- ६ वी ते ८ वी
उपक्रमाचे नाव :- नाट्यछटा / एक पात्री
उपक्रम तपशिल :नेहरुंच्या जीवनावर आधारीत ३ मिनिटांचा व्हिडिओ Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करावा.
दिवस क्र ०५
दिनांक :- १२ -११-२०२०
इयत्ता :- ९ वी ते १० वी
उपक्रमाचे नाव :- पोस्टर तयार करणे
उपक्रम तपशिल : स्वातंत्र्य संग्रामातील नेहरुजींच्या जीवनावर आधारित प्रसंग चित्र रेखाटणे व पोस्टर Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करणे .
दिवस क्रमांक:- ०५
दिनांक:- १२/११/२०२०
इयत्ता :-११ वी व १२ वी
उपक्रमाचे नाव :- निबंधलेखन
उपक्रमाचा तपशील :- १) स्वातंत्र संग्रामातील नेहरुंचे योगदान
२) नेहरु-औद्योगिक विकासाचा पाया रचणारे
३) नेहरु - विज्ञान व तंत्रज्ञान
( शब्द मर्यादा ९०० ते १००० ) या पैकी एका विषयावर A4 कागदावर निबंध लिहुन त्याचे फोटो Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करणे .
दिवस क्र ०६
दिनांक :- १३ -११-२०२०
इयत्ता :- ९ वी ते १० वी
उपक्रमाचे नाव :- निबंध लेखन
उपक्रम तपशिल : १) नेहरु - स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडण- घडणीतील वाटा
२) नेहरु - भारताचा शोध आत्मचरित्र
( शब्द मर्यादा ७०० ते ८०० ) निबंध लिहून अपलोड त्याचे फोटो Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करणे .
दिवस क्र ०६
दिनांक :- १३ -११-२०२०
इयत्ता :- ११ वी व १० वी
उपक्रमाचे नाव :- व्हिडिओ तयार करणे
उपक्रम तपशिल : १) नेहरुंच्या जीवनावर आधारित डाक्युमेंटरी तयार करणे .
( ५ मिनिटांचा व्हिडिओ Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करणे.
👇👇👇
दिवस क्र ०७
दिनांक :- १४-११-२०२०
इयत्ता :- १ ली ते १२ वी
उपक्रमाचे नाव :- बाल साहित्य ई-संमेलन
उपक्रम तपशिल : नेहरुंशी संबंधित कथा , कविता , प्रसंग सादर करणे ( स्वरचित ) वेळ ३ मिनिट
☝️☝️☝️
#बालदिवस सप्ताह स्पर्धेमध्ये भाग घेण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना
१) विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी संबंधित स्पर्धेच्या विषयासंबंधीचा फोटो/ व्हिडिओ पालक, शिक्षक यांच्या Facebook/ Twitter/ Instagram/ गुगल ड्राइव्ह या पैकी कोणत्याही एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह टाकून सदर पोस्ट ची लिंक आपण Copy करून ठेवायची आहे. एका वेळी एकाच स्पर्धेचे सादरीकरण साहित्य (फोटो /व्हिडीओ) Facebook/Twitter/Instagram वर अपलोड करावेत.
२) वरील पोस्ट टाकल्यानंतर व त्याची लिंक कॉपी करून झाल्यावर आपण www.scertmaha.ac.in वर स्पर्धेसाठी नावनोंदणी करावी. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता, शाळेचा UDISE क्रमांक (शिक्षकांकडून घ्यावा), मोबाईल क्रमांक, ईमेल आय.डी व ज्या स्पर्धेत भाग घेतला आहे त्याची वरील १ मध्ये नमूद केलेली लिंक सोबत असणे आवश्यक आहे. हे नसल्यास स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
३) क्र.१ व क्र.२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही केल्यावर स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध होणार आहे. ते डाऊनलोड करून घेण्यात यावे.
४) प्रत्येक स्पर्धेत एका विद्यार्थ्यास एकदाच भाग घेता येईल.
५) दुसऱ्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नव्याने पोस्ट तयार करून नव्याने नावनोंदणी करून स्पर्धेत भाग घेऊन क्र.१ ते ३ प्रमाणे कार्यवाही करावी.
६) सहभागी विद्यार्थ्यांमधून तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट सादरीकरणास पारितोषिके व प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे.
७) सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी Facebook/ Twittter / Instagram/ गुगल ड्राइव्ह वर पोस्ट करणे व आवश्यक तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे/ शिक्षकांचे सहाय्य घेणे अभिप्रेत आहे.
८) प्रत्येक स्पर्धेत सहभाग घेण्याची मुदत संबधित दिवशी रात्री १२.०० वाजता संपेल.
तालुका , जिल्हा व राज्य स्तरावरील बक्षिसांची निवड करण्यासाठी समित्या गठीत केलेल्या आहेत व विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे .
तरी आपल्या विभागातील सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.तरी सदर कार्यक्रमाबाबत
आपल्या शाळेतील शिक्षक, पालक,विद्यार्थी यांना याबाबत अवगत करण्यात यावे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी अडचण येत असल्यास आपल्या शाळेतील तंत्र स्नेही शिक्षकाची मदत घ्यावी.
No comments:
Post a Comment